loader
Breaking News
Breaking News
Foto

धुंदरे येथे विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांनी बांधला बंधारा

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेतून जिल्हा परिषद शाळा लांजा, उर्दू येथील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी एकत्र येत धुंदरे येथे बंधारा बांधला. या उपक्रमातून पाणी अडवा, पाणी जिरवा हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक साठा होण्यास मदत व्हावी तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने बुधवार १४ ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांसोबत प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेतल्याने त्यांच्यामध्ये पाण्याचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमात शिक्षक फकरूद्दीन कोतवडकर, आजीमुद्दीन शेख, जुवेरीया रईस यांच्यासह पालक हाफिज ठाकूर, फैरोज मुजावर आणि लांजा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे राजेश लांजेकर आदी सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg