संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील जुन्या व नादुरुस्त इमारतीमधील धोकादायक खोली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे. विशेष म्हणजे, या खोलीचे पाडकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानंतर तब्बल तीन वेळा स्मरणपत्रे देऊनही शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाला एखाद्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. राजवाडी ब्राह्मणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये शिक्षकांसाठी स्टाफ रूम असून, या इमारतीची अवस्था अत्यंत नादुरुस्त झाली आहे. त्यातील धोकादायक खोली कधीही दुर्घटनेचे कारण ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांची नियमित वर्दळ असल्याने या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळण्यासारखे असल्याची भावना पालक आणि ग्रामस्थांमध्ये आहे.
या खोलीचे पाडकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे डिसमॅन्टलचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, प्रस्ताव पाठवूनही कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायतीने तीन वेळा स्मरणपत्रे देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषद प्रभाग समितीच्या बैठकीतही या धोकादायक खोलीचा मुद्दा उपस्थित झाला होता. तरीही प्रत्यक्षात पाडकामाबाबत कोणतीही हालचाल झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी एवढा विलंब का? धोकादायक खोलीची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी आणखी किती पत्रव्यवहाराची गरज आहे? विद्यार्थ्यांच्या डोक्यावर संभाव्य धोक्याची टांगती तलवार कायम असताना शिक्षण विभाग नेमका कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर चौकशीचे आदेश, जबाबदारी निश्चित करण्याची भाषा आणि आश्वासनांचा पाऊस पडण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच खबरदारी घेणे अधिक महत्त्वाचे नाही का?. शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन धोकादायक खोलीची प्रत्यक्ष पाहणी करावी, तिचे पाडकाम करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी राजवाडी ब्राह्मणवाडी ग्रामस्थांकडून होत आहे. आता तरी शिक्षण विभागाला जाग येणार का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.







9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)



















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.