loader
Breaking News
Breaking News
Foto

२६ नोव्हेंबरपर्यंत संविधानाची उद्देशिका न बसवल्यास दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर बसपाचे बेमुदत उपोषणाचे अल्टिमेटम

दोडामार्ग, : तहसीलदार कार्यालयाच्या दर्शनी भागात भारतीय संविधानाची उद्देशिका सन्मानपूर्वक बसवावी, अन्यथा २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनापासून सकाळी १० वाजता बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा अंतिम इशारा बहुजन समाज पार्टीने (बसपा) प्रशासनाला दिला आहे. बसपाचे सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव दीपक बुधाजी जाधव यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी केली आहे. संविधानाची उद्देशिका हा लोकशाहीचा आत्मा असून प्रत्येक नागरिकाला संविधानिक मूल्यांची जाणीव व्हावी, यासाठी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कायमस्वरूपी फलक किंवा शिलालेख बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२६ नोव्हेंबरपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास कोणतीही माघार न घेता बेमुदत उपोषण सुरू करू, असा ठाम इशारा दीपक जाधव यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान आंदोलकाच्या प्रकृतीस काही बरे-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सीताराम तानू जाधव आणि कृष्णा गोविंद जाधव उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक आणि दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg