loader
Breaking News
Breaking News
Foto

१३ नोव्हेंबर रोजी १९८३ ते १९९० मधील जुन्या शिवसैनिकांचा हुंबरट येथे स्नेहमेळावा, आजी-माजी शिवसैनिकांना उपस्थितीचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) - सन १९८३ मध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सुरू झालेल्या शिवसेनेच्या प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि तत्कालीन शिवसैनिकांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी हुमरठ येथील हॉटेल सावली येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९८३ ते १९९० हा शिवसेनेच्या विस्ताराचा आणि संघटनात्मक संघर्षाचा महत्त्वाचा काळ होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या भूमिकेतून अनेक कार्यकर्त्यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी गावोगावी संघटनेचे काम केले. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना स्वतःच्या खिशाला चाट देत, प्रसंगी उपाशीपोटी राहून कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली. या संघर्षमय प्रवासातून अनेक गावांत शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये जिव्हाळ्याचे स्नेहबंध निर्माण झाले.

काळाच्या ओघात अनेक जुने सहकारी वेगवेगळ्या राजकीय पक्षांत कार्यरत झाले, तर काहीजण राजकारणापासून अलिप्त झाले. मात्र, राजकीय भूमिका आणि पक्षीय वाटा वेगळ्या झाल्या तरी जुन्या मैत्रीचे बंध कायम आहेत. याच भावनेतून जुन्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन गतकाळातील संघर्ष, आठवणी आणि अनुभवांना उजाळा द्यावा, या उद्देशाने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला तत्कालीन शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख तसेच सर्व आजी-माजी शिवसैनिक आणि जुन्या सहकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रकांनी केले आहे. या स्नेहमेळाव्याचे निमंत्रक म्हणून परशुराम उपरकर, नागेश मोर्ये, बाळा पाटकर, राजू राणे, बाळा राणे, रवि सावंत, चंदू हरियाण, बाळा शेट्ये आणि बबन कर्णिक यांनी पुढाकार घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg