loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई बाजारपेठ वाणीवाडी येथे स्वराज्य संस्था कोकण आणि अविनाश गुरव मित्र मंडळाच्या वतीने श्रमदानातून बंधारा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर पाणी साठवणूक व्हावी या हेतूने स्वराज्य संस्था कोकण व अविनाश दादा गुरव मित्र मंडळाच्या वतीने कडवई बाजारपेठ वाणीवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. उन्हाळ्याच्या तोंडावर कोकणात अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागते. यावर मात करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक भावनेतून पुढाकार घेत हा बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मोठी मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमावेळी भाजपा गोमाता संरक्षण समिती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा स्वराज्य संस्था कोकणचे संस्थापक अध्यक्ष अविनाश गुरव यांच्यासह स्वराज्य संस्था कोकणचे उपाध्यक्ष बावा कांबळे, भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य अनंत नादलस्कर, सुनिल कडवईकर, भाजप युवा मोर्चा संगमेश्वर तालुका सरचिटणीस प्रथमेश कडवईकर, युवा मोर्चा संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष चैतन्य रेडीज, कुणाल कांबळे, विनोद पवार, योगेश कदम, सुग्रीव लाखण, नयन कांबळे आणि हरेश कांबळे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामाजिक व जनहितोपयोगी उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg