loader
Breaking News
Breaking News
Foto

साधुग्राम तपोवनातच होणार; जागेला पर्याय असू शकत नाही : रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी --- साधुग्रामचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा : वृक्षतोडीवर सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन

नाशिक : (वार्ताहर) आईला जसा दुसरा पर्याय असू शकत नाही, तसाच कुंभमेळ्याच्या जागेलाही पर्याय असू शकत नाही. साधुग्राम तपोवनातच उभारले पाहिजे. त्यासाठी जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असेल, तर शासनाने त्यांची थकीत देणी आधी द्यावीत. शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये; मात्र, या प्रश्नामुळे कुंभमेळ्याच्या आयोजनावर परिणाम होऊ नये. गरज पडल्यास आम्ही मध्यस्थी करू, अशी ठाम भूमिका जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी गुरुवारी (दि. २९) नाशिक येथील पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी अखिल भारतीय अखाडा परिषद राष्ट्रीय प्रवक्ता महंत संजयदास महाराज, निर्वाणी अखाडा श्रीमंहंत मुरली दास महाराज, निर्वाणी अणी आखाडा महासचिव महंत सत्यदेवदास महाराज, महासचिव महंत नंदरम दास महाराज, महंत डॉ महेशदास महाराज, महंत राजेशदास महाराज, महंत भक्तिचरण दास महाराज, महंत हेमंत दास महाराज आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंहस्थाच्या नियोजनासाठी होणारी वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी विकासासोबत निसर्गाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. विकासासाठी काही प्रमाणात वृक्षतोड अपरिहार्य असली, तरी तोडलेल्या झाडांची अन्य ठिकाणी पुनर्लागवड करून ती जगविण्याची जबाबदारी शासनाची आहे. ओसाड डोंगरांवरही वृक्षारोपण करावे आणि कमीत कमी झाडे तोडून साधुग्रामचा प्रश्न मार्गी लावावा, असे ते म्हणाले. दरम्यान, ३० ऑक्टोबरला ध्वजपूजन आणि ग्रामपरिक्रमेची भव्य शोभायात्रा निघणार असून, हजारो भाविक सहभागी होणार आहेत. ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्याला रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

टाइम्स स्पेशल

दुष्काळी परिस्थितीमुळे साधुसंतांचा पाण्याबाबत कोणताही अट्टहास नाही. रामकुंडात थोडेफार पाणी सोडले, तरी सहकार्याची भूमिका राहील. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि जनावरांसाठी साधुसंत शासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत करतील. कुंभमेळ्यावरील खर्चावरून टीका करणाऱ्यांनी दुष्काळ निवारण आणि धार्मिक परंपरा या दोन्ही बाबींचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले. गोदावरीत गटारीचे पाणी मिसळणे थांबवून नदीचे प्रदूषण रोखण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.‘जेन झी’ ही देशाची मोठी ताकद असून, तरुणांनी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावे. पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे सांगतानाच, विघातक शक्तींनी तरुणांचा वापर करून देशाचे नुकसान करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg