loader
Breaking News
Breaking News
Foto

उत्तर प्रदेशच्या मतदार याद्यांमधून १ कोटी हिंदू मतदारांची नावे गायब; योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मतदार याद्यांमधून एक कोटीहून अधिक हिंदू मतदारांची नावे वगळल्याचा दावा करत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना अशा पात्र मतदारांची ओळख पटवून त्यांची नोंदणी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना योगी म्हणाले की, विधानसभा मतदार याद्यांमधून मोठ्या संख्येने हिंदू मतदारांची नावे गायब आहेत. त्यांनी अशा काही गटांचा उल्लेख केला, ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केलेली नाहीत.मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ६६ लाख लोक, ज्यांची नावे पंचायत मतदार याद्यांमध्ये आहेत, ती विधानसभा मतदार याद्यांमधून वगळली गेली आहेत. याव्यतिरिक्त, सरकारी कल्याणकारी योजनांचे सुमारे ५५ लाख लाभार्थीही मतदार म्हणून नोंदणीकृत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता हि नावे निवडणुकीनंतर तुम्हीच वगळली असा प्रश्न विरोधी पक्षाने केला आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg