रत्नागिरी (प्रतिनिधी ) : पावसाने ऐन हंगामात फिरवलेली पाठ, लहरी हवामान आणि रणरणत्या उन्हामुळे जिल्ह्यातील भातशेती गंभीर संकटात सापडली असून बळीराजा पुरता होरपळून निघाला आहे. या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी थेट शेतकर्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे, कातळवाडी आणि डुगवे परिसरातील करपून गेलेल्या व दाणा न भरलेल्या भातशेतीची पाहणी करून त्यांनी बाधित शेतकर्यांना धीर दिला. तसेच उर्वरित सर्व बाधित भागाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून तत्काळ अहवाल शासनाकडे सादर करण्याचे कडक आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले.
जिल्ह्यात जुलै आणि विशेषतः सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्याने भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पाहणीदरम्यान शेतकर्यांनी शेतातील करपलेली व पोकळ भाताची रोपे दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. वरून पीक काही प्रमाणात हिरवे दिसत असले तरी पोटर्यांमध्ये दाणा भरलेला नसून ओंब्या पूर्णपणे पोकळ आणि चिंब झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सामान्यतः भाताच्या रोपाला १२ ते १८ फुटवे येतात, मात्र यंदा पाण्याच्या तीव्र दुर्भिक्ष्यामुळे केवळ ५ ते ७ फुटवेच आले आहेत. त्यातच कडा करपा, काजळी आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक हातचे गेले आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी ओढवलेल्या भीषण परिस्थितीचीच पुनरावृत्ती यंदा झाल्याची खंत स्थानिक शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांसमोर व्यक्त केली.
शेतकर्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी, संकटाच्या काळात प्रशासन बळीराजाच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही दिली. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे १२०० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित सर्व गावांमधील काम स्थानिक ग्रामपंचायत व कृषी यंत्रणेमार्फत पुढील एक ते दोन आठवड्यांत १०० टक्के पूर्ण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी ई-पीक पाहणी आवश्यक असल्याने सहायक कर्मचार्यांची संख्या वाढवून हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाहणी दौर्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.