loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी येथील भगवती देवीचा नवरात्रोत्सवास प्रारंभ

गावखडी (वार्ताहर) - हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी भुतेवाडीतील जागृत देवस्थान श्री भगवती देवीचा नवरात्र उत्सव भक्तीमय वातावरणात रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 पासून प्रारंभ झाला आहे. या नवरात्र उत्सवानिमित्त 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता देवीचे मुखवटे लावण्यात आले. व सकाळी अकरा वाजता घटस्थापना करण्यात आली असून रात्री ठीक साडेसात वाजता दररोज देवीची आरती व रात्री दहा वाजता ग्रामस्थांचे भजन सादर करण्यात येईल. त्याचप्रमाणे दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी बलिदान दिवशी दुपारी बारा वाजता देवीची आरती, प्रसाद रात्री ठीक आठ वाजता भगवती देवीचा गोंधळ आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक 20 ऑक्टोबर 2026 रोजी दसऱ्याच्या दिवशी तोरणे बांधण्यात येणार आहेत. देवीची पूजा, आरती सायंकाळी चार वाजता सोने लुटून त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री भगवती देवीचा दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी श्री भगवती देवी ग्रामस्थ मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती दीपक भुते यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg