loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती सभेत सभापती प्रविण पांचाळ यांची आक्रमक आणि स्प्ष्ट भूमिका; कागदोपत्री निर्णय घेण्यापेक्षा प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे

रत्नागिरी : रत्नागिरी पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत विकासकामांबाबत अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका पाहायला मिळाली. केवळ कागदोपत्री निर्णय घेण्यापेक्षा त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे, असा सक्त संदेश सभापती प्रवीण पांचाळ यांनी प्रशासनाला दिला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पाणी योजना, दर्जेदार रस्ते-बांधकामे आणि सुरळीत एसटी सेवा या प्रमुख विषयांवर विशेष भर दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या ग्रामीण भागात जाणवणार्‍या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांच्या कामांना वेग देण्याचे निर्देश सभापतींनी दिले. गावोगावी नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास टळावा आणि सुरू असलेल्या योजना वेळेत पूर्ण व्हाव्यात, यादृष्टीने प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. तसेच, बांधकाम विभागामार्फत होणार्‍या विकासकामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत प्रत्येक कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश त्यांनी दिले.

टाईम्स स्पेशल

याशिवाय, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाणारी एसटी बससेवा कोणत्याही कारणाने खंडित होणार नाही, याची गांभीर्याने दक्षता घेण्यास सांगण्यात आले. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेळेवर व सुरळीत वाहतूक सेवा मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण बैठकीत कंचन नागवेकर, तारक मयेकर, दादा दळी आणि नेताजी पाटील यांनीही विविध स्थानिक प्रश्न आक्रमकपणे मांडले. गटविकास अधिकारी शेळके यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. एकूणच, ग्रामीण जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्याचा स्पष्ट अजेंडा या सभेच्या माध्यमातून प्रशासनासमोर ठेवण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg