रत्नागिरी - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील 'SNCU' (विशेष नवजात शिशु काळजी कक्ष) आणि स्त्री रुग्ण विभागातील डॉक्टर तसेच परिचारिकांच्या उत्कृष्ट व संवेदनशील रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता म्हणून चांदोर येथील आखाडे परिवाराने रुग्णालयाला ०४ लोखंडी बाकडे (बेंच) भेट दिले आहे. 'लौकिक मंदा बालकृष्ण आखाडे' यांच्या नावे हे बाकडे रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले.
चांदोर, दोन आंबा, ता. जि. रत्नागिरी येथील रहिवासी असलेले बाळकृष्ण आखाडे यांच्या कुटुंबातील कौटुंबिक प्रसंगानिमित्त हा निर्णय घेण्यात आला. त्यांची पत्नी आयसीयू (ICU) मध्ये काही दिवस दाखल होत्या, व त्याच वेळी त्यांचा लहान मुलगा २४ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रुग्णालयाच्या SNCU विभागात उपचार घेत होता. या अत्यंत कठीण आणि चिंतेच्या काळात रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने दोन्ही रुग्णांना अतिशय चांगली आणि तत्पर सेवा दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि देखरेख या काळात अत्यंत महत्त्वाची ठरली.
तसेच SNCU विभाग आणि स्त्री रुग्ण विभागातील सर्व परिचारिका व इतर कर्मचारी स्टाफने रुग्णांची अत्यंत आपुलकीने आणि काळजीपूर्वक सेवा केली. शासकीय रुग्णालयात मिळालेल्या या उच्च दर्जाच्या सेवेमुळे भारावून जाऊन, आखाडे कुटुंबीयांनी रुग्णालयात येणाऱ्या इतर रुग्णांच्या नातेवाईकांच्या सुविधेसाठी बसण्यासाठी हे लोखंडी बाकडे प्रशासनाकडे सुपूर्द केले. आपल्या हक्काच्या शासकीय रुग्णालयाप्रती केवळ कृतज्ञता न बाळगता, सामाजिक बांधिलकी जपत आखाडे कुटुंबीयांनी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध करून दिलेली ही मोलाची मदत अत्यंत कौतुकास्पद आणि वंदनीय आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या या सेवाभावी वृत्तीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, आखाडे परिवाराने व्यक्त केलेली ही कृतज्ञता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.