loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्रकार आशिष कारेकर यांना पितृशोक, वारकरी संप्रदायाचा आधारवड हरपला

गुहागर - गुहागर तालुका वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, प्रसिद्ध आचारी आणि ज्येष्ठ नागरिक ह.भ.प. सुरेश रंगनाथ कारेकर उर्फ आबा कारेकर (७३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत सेवेकरी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. आबा कारेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी समर्पित केले होते. तळवली वारकरी संप्रदाय उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धार्मिक, आध्यात्मिक आणि सांप्रदायिक कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रसिद्ध आचारी म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि धार्मिक कार्यातील सहभागामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. पत्रकार आशिष कारेकर यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने कारेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टाईम्स स्पेशल

कै. ह.भ.प. सुरेश रंगनाथ कारेकर उर्फ आबा कारेकर यांना त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक २८ रोजी तळवली बागकर स्टॉप येथील स्मशानभूमीत होणार असून बारावे कार्य शुक्रवार दि. ३० रोजी व उत्तरकार्य शनिवार दि.३१ रोजी तळवली भेळेवाडी येथील राहत्या घरी पार पडणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg