loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रमदानातून पाणी अडवले: चांदेराई परिसरात बंधाऱ्यांची मोहीम यशस्वी

रत्नागिरी : भविष्यातील संभाव्य भीषण पाणीटंचाईचे संकट वेळीच ओळखून लोकसहभागातून जलसंधारणाचा एक आदर्श वस्तूपाठ चांदेराई आणि आसपासच्या गावांनी घालून दिला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेला बळ देत चांदेराई, टिके, टेंभ्ये, हरचिरी, कुरतडे, चिंद्रवली, झरेवाडी, सोमेश्वर, पोमेंडीखुर्द आणि उमरे या गावांमध्ये ‘मिशन बंधारे - २०२६’ अंतर्गत वनराई बंधारे उभारणीचा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या मोहिमेचे महत्त्व ओळखून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर यांनी सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांचे मनापासून आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भविष्यात पाण्याची कोणतीही अडचण भासू नये यासाठी प्रशासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक एकत्र आले होते. या मोहिमेत सर्वच घटकांनी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले. गावच्या सरपंचांनी आणि प्रशासकांनी उत्कृष्ट नियोजन करत या मोहिमेचे खंबीर नेतृत्व केले. तर गावातील तरुण मंडळी आणि ग्रामस्थांनी कडक उन्हाची वा फिकीर न करता प्रत्यक्ष श्रमदान करून बंधारे उभारणीत मोलाचा वाटा उचलला. याशिवाय सामाजिक भान जपत महिला बचत गटांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, तर शालेय विद्यार्थ्यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून अत्यंत उत्साहाने श्रमदानात सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

या यशस्वी उपक्रमाबद्दल बोलताना महेंद्र झापडेकर यांनी सांगितले की, पाण्याचे नियोजन ही काळाची गरज बनली आहे. आज जर आपण योग्य वेळी पाणी अडवून जिरवले, तरच येणाऱ्या पुढच्या पिढीला पाण्याचा तुटवडा भासणार नाही. या सर्व गावातील नागरिकांनी दाखवलेली ही एकी आणि श्रमदानातून उभे केलेले बंधारे संपूर्ण परिसरासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी उन्हाळ्यातही टिकून राहील, असा विश्वास सर्व उपस्थितांनी या वेळी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg