loader
Breaking News
Breaking News
Foto

उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ; म्हसळा बसस्थानकाजवळ दिवाळी स्टॉलला ग्राहकांची पसंती

म्हसळा (वार्ताहर) - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ मिळावे, या उद्देशाने उमेद अभियानाच्या माध्यमातून म्हसळा बसस्थानकाजवळ आकर्षक दिवाळी विक्री स्टॉल उभारण्यात आले आहेत. या उपक्रमात श्री म्हसोबा गट घोणसे, श्री समर्थ गट टोंडसुरे, सखी महिला उत्पादक गट देवघर, फिजा गट वारळ, महालक्ष्मी गट काळसुरी, भाग्यलक्ष्मी गट काळसुरी आणि सोमजाई माता गट खरसई या महिला बचत गटांनी स्टॉल लावले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्टॉलवर महिला बचत गटांनी तयार केलेला पारंपरिक दिवाळी फराळ, विविध प्रकारच्या मिठाई, गृहउपयोगी वस्तू, आकर्षक पणत्या आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरगुती पद्धतीने तयार केलेल्या या वस्तूंना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्टॉलचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती बबन श्रीपत मनवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, अनिल बसवत, उपसभापती लहू म्हात्रे, महेश घोले, गटविकास अधिकारी मंगेश साळी, तालुका अभियान व्यवस्थापक रोहिणी निळेकर यांच्यासह प्रभाग समन्वयक, ग्रामसखी, प्रभाग संघ व ग्रामसंघ पदाधिकारी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती.

टाईम्स स्पेशल

महिलांच्या हाताला काम आणि त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांची बाजारपेठ मिळाल्याने या उपक्रमातून महिला बचत गटांच्या उत्पन्नवाढीला चालना मिळत आहे. नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीसाठी या स्टॉलला भेट देऊन महिला बचत गटांच्या स्वनिर्मित वस्तूंची खरेदी करावी आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg