loader
Breaking News
Breaking News
Foto

दादासाहेब सरफरे विद्यालयात एन एम एम एस तालुकास्तरीय शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

बुरंबी–शिवने(ता. संगमेश्वर) - येथील दादासाहेब सरफरे विद्यालयात शिक्षण विभाग पंचायत समिती देवरुख व संगमेश्वर तालुका माध्य. व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, तसेच बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानेएन एम एम एस परीक्षा तालुकास्तरीय शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्था सभागृहात संपन्न झालेल्या कार्यशाळेचे उदघाटन शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचालक शांताराम जाधव, केंद्रप्रमुख स्वरा वाजे, मुचरी नूतन विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश विरकर, संगमेश्वर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अमोल सरनबोत, सचिव मारुती चोरमाले, उपाध्यक्ष शिवाजी बंडकर यांच्यासह मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शकांनी एन एम एन एस परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासोबतच गुणवत्तापूर्ण यश मिळावे, या उद्देशाने दिवसभर विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमणे परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, योग्य अध्ययन पद्धती, सरावाचे नियोजन, विद्यार्थ्यांची निवड आणि प्रभावी मार्गदर्शनाच्या विविध पद्धती याबाबत शिक्षकांना तर विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, आकलनशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रभावी अध्यापन पद्धतींची माहिती देत मार्गदर्शन केले. कार्यशाळेत दिवसभर अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक सत्रे घेऊन शिक्षकांना एन एम एम एस परीक्षेच्या तयारीसाठी मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या निलम पवार, सुहास गेल्ये, घाणेकर आणि मनाली जाधव या सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांचा संगमेश्वर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करणेत आला. तर मुख्याध्यापक संघाच्या वतीने शाळा समिती अध्यक्ष दिनेश जाधव, संस्था संचालक शांताराम जाधव, प्राचार्य प्रकाश विरकर आणि केंद्रप्रमुख स्वरा वाजे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

तसेच बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रप्रमुख स्वरा वाजे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अमोल सरनबोत, उपाध्यक्ष शिवाजी बंडकर आणि सचिव मारुती चोरमाले यांचा सत्कार करण्यात आला. शाळा समिती अध्यक्ष दिनेश जाधव यांनी संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांना सक्षम करणारी ही कार्यशाळा ठरत आहे, असे सांगितले. कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख स्वरा वाजे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अमोल सरनबोत यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका निलम पवार यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg