loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पुष्कर गितेला द्वितीय क्रमांक

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा-संगमेश्वर संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या पुष्कर दत्ताराम गिते याने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. पुष्करने १९ वर्षांखालील ग्रीको-रोमन प्रकारातील ६७ किलो वजनी गटात सहभाग घेतला होता. जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक मिळवत शाळेचे तसेच संगमेश्वरचे नाव उज्ज्वल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि क्रीडाप्रेमींनी पुष्करचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कुस्ती क्षेत्रातील या यशामुळे पुष्करच्या पुढील क्रीडा कारकिर्दीकडून संगमेश्वर परिसरातील क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg