loader
Breaking News
Breaking News
Foto

परशुराम घाटात भीषण अपघात! ब्रेक फेल झाल्याने केमिकलचे ड्रम वाहून नेणारा कंटेनर डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला; दुचाकीस्वार जागीच ठार!

खेड (दिलीप देवळेकर) - मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भीषण अपघात. लोटे येथून केमिकलने भरलेले ड्रम घेऊन जाणार्‍या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेला. यावेळी लोटे येथे कामावर जाणार्‍या दुचाकीस्वाराला कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कंटेनर आणि दुचाकी रस्त्याखाली कोसळले. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या धडकेनंतर कंटेनर आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळले. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत दुचाकीस्वार लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, मृत व्यक्तीची ओळख आणि इतर तपशील अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची माहिती मिळताच जय हिंद अ‍ॅम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे नवनाथ घोलप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. केमिकलचे ड्रम वाहून नेणारा कंटेनर महामार्गाच्या विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला धडकण्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ब्रेक फेल झाल्यामुळे एका निष्पाप दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याने महामार्गावरील अवजड वाहनांच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. अपघाताच्या नेमक्या कारणांचा आणि पुढील तपासाचा तपशील समोर येणे बाकी आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg