खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील महत्वाचा असलेला नातू नगर ते तुळशी बुद्रुक-खिंड रस्त्याच्या तुळशी खुर्द हद्दीतील जमीन मोजणी आणि शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत गंभीर त्रुटी राहिल्या असल्याचा आरोप करत तुळशी खुर्द येथील संजय दरेकर व शेकडो ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. फेर सर्व्हे करून सुधारित अधिसूचना जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून तहसील कार्यालयाच्या मैदानात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शांततेच्या मार्गाने करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत उपोषण नोटीस प्रशासनाला सादर केली आहे. ही नोटीस उपविभागीय अधिकारी, खेड, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, खेड आणि उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, खेड यांना देण्यात आली आहे. तसेच या नोटीसीच्या प्रती माहितीसाठी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, जिल्हाधिकारी रत्नागिरी, तहसीलदार खेड आणि पोलीस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आल्या आहेत.
ग्रामस्थांच्या मते, या रस्त्याच्या मोजणी प्रक्रियेत जमीन मालकांना विश्वासात घेतले गेले नाही आणि अधिसूचनेत अनेक चुका आहेत. त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय होत आहे. निवेदनात ग्रामस्थांनी ७ मुद्दे मांडले आहेत: १) सर्व्हे नंबरमध्येच घोळ : अधिसूचनेत सर्व्हे नंबर ७० चा उल्लेख करण्यात आला आहे, प्रत्यक्षात तो सर्व्हे नंबर ७७ आहे. तसेच ७७/२ मध्ये सुधाकर बाबुराव दरेकर यांची ४ हापूस आंब्याची झाडे रस्त्यात गेली आहेत, त्याचा सर्व्हेमध्ये उल्लेखच नाही. २) ७९/४ नंबर गायब : सर्व्हे नं. ७९/४ मधून रस्ता जात असल्याचा स्पष्ट उल्लेख नकाशामध्ये आहे, परंतु अंतिम अधिसूचनेमध्ये ७९/४ या सर्व्हे नंबरचाच उल्लेख वगळण्यात आला आहे. ३) गुंठेवारीत तफावत : सर्व्हे नंबर ३ मध्ये प्रत्यक्षात ५० ते ६० गुंठे जागा संपादित झाल्याचे दिसत आहे, परंतु अधिसूचनेत केवळ ०.१०.०० हेक्टर इतकाच उल्लेख आहे. ४) घर दुसर्याच्याच नावे : सुधाकर बाबुराव दरेकर यांचे स्वतःचे घर सदर रस्त्यात गेले असताना, ते घर अंजली दळवी यांच्या नावे दाखवण्यात आले आहे. ही गंभीर चूक दुरुस्त होणे आवश्यक आहे.
५) हापूसच्या झाडांची नोंद नाही : सर्व्हे नं. ११/२ मध्ये अनंत दरेकर व संजय दरेकर यांची दोन हापूसची झाडे रस्त्यात गेली आहेत. एक झाड रस्ता तोडताना गेले असून दुसरे झाड अजूनही रस्त्याच्या कडेला दरडीत आहे, परंतु याची कोणतीही नोंद सर्व्हेत घेण्यात आलेली नाही. ६) मोजणी नकाशात वेगळाच नंबर : सर्व्हे नं. ९२/७ मधून रस्ता गेल्याचे संतोष दरेकर यांनी सर्व्हे नं. ९३/४ ची शासकीय मोजणी केल्यावरून दिसून येते, मात्र प्रत्यक्ष मोजणी नकाशात त्या जागेवर अन्य नंबर दाखवण्यात आला आहे. ७) चार पट मोबदल्याची मागणी दुर्लक्षित : सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी प्रतिमार्ग असल्याने हायवेच्या दरानुसार रेडीरेकनरच्या दराच्या चार पट मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही.. या सर्व मुद्यांचा विचार करता तुळशी खुर्द हद्दीतील संपूर्ण जमीन मोजणी प्रक्रिया सर्व जमीनदारांच्या उपस्थितीत पुन्हा होणे आणि त्यानुसार सुधारित अधिसूचना प्रसिद्ध होणे अत्यावश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर २ ऑक्टोबरपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.