रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी शहरातील चवंडेवठार येथील लक्ष्मी चौक परिसरात मित्रांसोबत अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने ३५ वर्षीय तरुणाचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण चवंडेवठार परिसरावर तीव्र शोककळा पसरली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्मित नरेंद्र चवंडे (वय ३५, रा. चवंडेवठार, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी स्मित चवंडे हा आपल्या मित्रांसोबत चवंडेवठार येथील लक्ष्मी चौकात नेहमीप्रमाणे अंडरआर्म क्रिकेट खेळत होता. खेळ सुरू असतानाच अचानक त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत कोसळला. हा प्रकार पाहून मैदानावरील मित्रांची एकच धावपळ उडाली. त्याचा मित्र युगेश सावंत याने तातडीने स्मितचा भाऊ सुशांत चवंडे याला फोनवरून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी क्षणाचाही विलंब न लावता स्मित याला सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास उपचारासाठी तातडीने रत्नागिरी येथील पारकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक तपासणीअंती स्मित याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. खेळताना अचानक घडलेल्या या दुर्देवी प्रसंगामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजि. नं. १३१/२०२६ नुसार नोंद केली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.