loader
Breaking News
Breaking News
Foto

पुण्यातील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रणाली तोडणकर- धुळप यांना ‘नृत्य सुजन’ पुरस्कार; नृत्यार्पणच्या विद्यार्थिनींचेही यश

रत्नागिरी : पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नृत्यलास्य – ऑल इंडिया सेकंड क्लासिकल-फोक-मॉडर्न नॅशनल डान्स कॉन्टेस्ट अँड फेस्टिव्हल’ या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत रत्नागिरीच्या नृत्यार्पण नृत्य अकादमीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.नटराज आर्ट अँड कल्चरल हेरिटेज फाउंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नृत्यर्पण नृत्य अकादमीच्या संचालिका आणि प्रसिद्ध भरतनाट्यम गुरू प्रणाली तोडणकर धुळप यांना त्यांच्या नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘नृत्य सुजन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत भरतनाट्यम नृत्यप्रकारात नृत्यार्पण अकादमीच्या विद्यार्थिनींनीही यशाची मोहोर उमटवली.मायनर गटात गायत्री नागवेकर आणि अनाहिता पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला.तर ज्युनिअर गटात ओवी साळवी हिने तृतीय क्रमांक, तर धनश्री पवार हिने चतुर्थ क्रमांक मिळवला.राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशामुळे नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या यशाबद्दल प्रणाली तोडणकर - धुळप आणि सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे नृत्य क्षेत्रातून तसेच सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg