loader
Breaking News
Breaking News
Foto

ओटवणेत 'ओंकार'चा तांडव! हत्तीला वाऱ्यावर सोडलय का ?; ग्रामस्थांचा वनविभागाला सवाल, वनकर्मचारी सोबत नसल्याने तीव्र नाराजी

सावंतवाडी : नेमळे येथील वादानंतर ओंकार हत्ती ओटवणे गावात दाखल झाला. दोडामार्ग येथील जंगल भागात त्याला नेण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ओटवणे गावात हत्तीकडून वाहनांच नुकसान करण्यात आले. यावेळी सोबत असणारे वनकर्मचारी ओंकारसह नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हत्तीला वाऱ्यावर सोडलं का ? असा सवाल ग्रामस्थांनी केला. ओंकारला एकटं सोडून जाणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलंच धारेवर धरल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओटवणे परिसरा 'ओंकार' हत्तीने ग्रामस्थांच्या मालमत्तेचे नुकसान केले. यावेळी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रात्री १० वाजण्याच्या सुमारास ओंकार हत्ती अचानक येथील ग्रामस्थांच्या घरासमोर दाखल झाला. अंगणात उभ्या असलेल्या नॅनो कारसह दुचाकीची त्याने तोडफोड केली. मात्र, सोबत असणारी वनविभागाची टीम याबाबत अनभिज्ञ होती. हत्तीसह कुणीही उपस्थित नव्हते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी कर्मचारी जेवण करण्यासाठी गेले असल्याचे उपस्थित वनकर्मचाऱ्यांकडून सांगितले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सगळे एकदम जेवायला गेले का ? ओंकार हत्तीला वाऱ्यावर सोडलं आहे का ? असा सवाल केला. वन कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg