loader
Breaking News
Breaking News
Foto

भातशेती व इतर पिकांचे पावसाअभावी नुकसान; पंचनामे करून शेतकर्‍यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, नगरसेविका ज्योती जाधव

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतीतील पिके करपून जात असून, विशेषत: भातशेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर शासनाने संबंधित यंत्रणेमार्फत सर्व शेतातील पिकांचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त सर्व शेतकर्‍यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगरसेविका ज्योती रमाकांत जाधव यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

पावसाअभावी पिकांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या उत्पन्नावर परिणाम करणारे आहे, त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणताही शेतकरी वंचित राहू नये, तसेच नुकसानभरपाई तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg