loader
Breaking News
Breaking News
Foto

महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधातील आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जाहीर पाठिंबा!

देवगड (प्रतिनिधी) - जामसंडे परिसरात महावितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः व्यवसायाच्या महत्त्वाच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. महावितरणच्या या अनियोजित आणि मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी आयोजित केलेल्या निषेध आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत.असे युवासेना शिवसेना तालुका प्रमुख देवगड गणेश गावकर यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वीजपुरवठा हा नागरिकांच्या मूलभूत गरजांशी आणि व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. देखभाल किंवा दुरुस्तीची कामे करायची असल्यास त्याबाबत नागरिकांना व व्यावसायिकांना पूर्वसूचना देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने वीजपुरवठा खंडित करणे कदापि योग्य नाही. देवगडमधील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याची गरज असताना अशा प्रकारच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे नुकसान होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महावितरणने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करावा तसेच नियोजित वीजबंदबाबत नागरिकांना आगाऊ सूचना देण्याची व्यवस्था करावी.

टाईम्स स्पेशल

या प्रश्नाकडे केवळ व्यावसायिकांचा प्रश्न म्हणून न पाहता संपूर्ण देवगड-जामसंडे शहरातील नागरिकांच्या हिताचा प्रश्न म्हणून पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता महावितरण कार्यालय, देवगड (पवनचक्की) येथे आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि महावितरणच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी उभा राहील असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg