सावंतवाडी(प्रतिनिधी) - गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे. हा सण अधिकाधिक पर्यावरणपूरक, स्वच्छ व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत विविध उपक्रम राबवून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नगरपरिषदेकडून नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप करून पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करणे, कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करणे, निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करणे, सजावटीमध्ये पर्यावरणाचा वापर करणे, ध्वनी प्रदूषण टाळणे, वीज बचत करणे तसेच कचर्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
जलप्रदूषण टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने बोट क्लब, निर्माण भवन जवळ, शिवउद्यान समोरील बाजूस, भटवाडी, सर्वोदय नगर, जुस्तीन नगर, मराठा वसतिगृह नजीक, आणि होळीचा खुंट अशा विविध ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन कुंड बसवून विसर्जनाची चोख व्यवस्था केली होती. तसेच विसर्जन ठिकाणी कुंडांमध्ये फुलांची आरास करण्यात आली होती व सुरक्षेसाठी तसेच मदतीसाठी नगरपरिषदेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
नगरपरिषदेच्या या उपक्रमास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण ४५ गणेशमूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले. पर्यावरणपूरक सण साजरे करताना जलप्रदूषण टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून यापुढेही मोठ्या प्रमाणात अशा मोहिमा राबविल्या जाणार आहेत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोसले, उपनगराध्यक्ष अँड अनील निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर, सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे नगरपरिषदेने म्हटले आहे.












































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.