loader
Breaking News
Breaking News
Foto

तळेकांटे येथे वनराई बंधारा, सरपंच सुषमा बने यांचा पुढाकार!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत तळेकांटे आणि ग्रामस्थांच्या वतीने 'मिशन बंधारे अभियानाच्या ' अंतर्गत लोकसहभागातून ' कळंबटे वाडी ' येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका दुष्काळी तालुका म्हणून नुकताच शासनाने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर हा गावातील पहिला वनराई बंधारा बांधण्यात आला. गावाच्या सरपंच सुषमा बने यांनी या कामी पुढाकार घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तळेकांटे गावातून 'बावनदी ' आणि 'सप्तलिंगी ' या दोन बारमाही नद्या वाहतात. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सप्तलिंगी आणि बावनदीवर मिशन बंधारे अंतर्गत किंवा इतर कोणत्याही योजनेच्या अंतर्गत बंधारे बांधून जलसंधारणेची कामे सरकारने सुरू केली पाहिजे. गावातून दोन बारमाही नद्या वाहतात पण वाडी वस्तीत पिण्याचे पाणी नाही अशी वेळ ग्रामस्थांवर येऊ नये यासाठी जल जीवन मिशनचे काम ही शासनाने प्राधान्याने सुरू केले पाहिजे अशी मागणी सरपंच सुषमा बने यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

कळंबटे वाडी येथे बांधलेल्या मिशन बंधारेच्यावेळी सरपंच सुषमा बने, ग्रामपंचायत सदस्य तुषार गुरव, पोलीस पाटील अनिल कळंबटे, अंगणवाडी सेविका, श्रेया रेवाळे,ग्रामपंचायत कर्मचारी बाबू रेवाळे,अमृता रेवाळे, स्वाती शिंदे, ग्रामस्थ संतोष कळंबटे, मनोज कळंबटे, अंकिता अनिल कळंबटे, आराध्या कळंबटे, देवश्री कळंबटे, जयश्री कळंबटे, सरिता कळंबटे, आदित्य जाधव आदी ग्रामस्थ्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg