loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यापासून चांद्यापर्यंत हिंदू जनजागृती मोहीम, ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

बांदा : हिंदू जनजागृतीच्या उद्देशाने बांद्यापासून चांद्यापर्यंत मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री ना. नितेश राणे यांनी हिंदू समाजाने संघटित होऊन आपल्या धार्मिक परंपरा आणि श्रद्धांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. हलाल प्रमाणपत्र, त्यासाठी आकारले जाणारे शुल्क, धार्मिक परंपरा आणि हिंदू समाजाची एकजूट या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोहिमेचे संयोजक प्रसन्न शिंदे यांनी आपल्या भाषणात हलाल प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून काही खासगी संस्था आणि कंपन्यांकडून व्यावसायिकांकडून शुल्क आकारले जात असल्याचा आरोप केला. या शुल्कामुळे उत्पादकांच्या वस्तूंच्या किमती वाढतात आणि त्याचा आर्थिक भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडतो, असे त्यांनी सांगितले. या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालावे आणि मुख्यमंत्री स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली. ना. नितेश राणे यांच्या निर्देशानुसार प्रमोद सावंत यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केल्याचे सांगत त्यांनी आभार मानले. हिंदू समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही जनजागृती मोहीम बांद्यापासून चांद्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg