loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील महिला बालगंधर्व रंगमदिर पुणे नाट्यगृहात सादर करणार महाराष्ट्रातील पहिले महिलांचे नमन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ रत्नागिरी या मंडळामार्फत महिला कलाकारांना एकत्र करून त्यांना व्यासपीठ देण्यासाठी माऊली महिला नमन मंडळाची स्थापना करून महिला कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे. या नमन मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे मुबंई सारख्या शिवाजी मंदिर दादर येथे जावूनही प्रयोग केला आहे. नुकताच या नमनाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोगही साजरा झाला आणि आता ५२ वा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सोमवार दि ७/१२/२०२६ रोजी रात्रौ ९:३० वाजता होत आहे. या नमनामध्ये नमनसम्राट यशवंत वाकडे यांनी लिहिलेला पौराणिक गण व नटखट गौळण, रावणनृत्य असे विविध कला प्रकार सादर होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये निर्माता साईनाथ नागवेकर, विशेष सहाय्य शरद गोळपकर, दादा वाडेकर, वासुदेव वाघे, सागर मायंगडे, महिला अध्यक्षा प्रेरणा विलणकर, नेपथ्य संतोष उर्फ बावा आग्रे व संगीतसाथ परशुराम घवाळी, साई घवाळी, पार्तेज आंबेरकर करत आहेत. गायिका आकांक्षा वायंगणकर, असून पूनम गोळपकर, वेदा शेट्ये, रेश्मा शिदे, विनया काळप, तन्वी नागवेकर, समिक्षा वालम, रिमा देसाई, ज्योती कदम, शिवानी मयेकर, पूर्वा चव्हाण, आदिती पवार, निरजा जोगळे, बाल कलाकार कियारा नागवेकर आदी कलाकार आपल्या भूमिका साकरत आहेत. यासाठी तिकीट विक्री बालगंधर्व रंगमदिर पुणे येथे चालू आहे. या प्रयोगासाठी या महिलांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन मंडळाचे सचिव वासुदेव वाघे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg