loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड खाकशी तिठा येथे जुगार अड्ड्यावर धाड: ४६.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवगड, (प्रतिनिधी) - खाकशी तिठा येथील सिंधुदुर्ग सोशल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह वाहने, मोबाईल, पत्ते, टेबल व खुर्च्या असा एकूण सुमारे ४६ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी काही जण प्रत्यक्ष तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले, तर काही जण जुगार खेळणार्‍यांना मदत करण्यासाठी तसेच खेळासाठी तेथे उपस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १) आदीनाथ संतोष परब, वय-३०, रा. जामसंडे, ता. देवगड २) दिपक गुरुनाथ डगरे, वय-३२, रा. देवगड ३) प्रविण रामचंद्र निबांळकर, वय-४०, तळेबाजार, ता. देवगड, ४) नाना शंकर राठोड, वय-३०, रा. पडेल कॅटीन, ता. देवगड, ५) राजेंद्र चंद्रकांत कांबळे, वय-५१, रा. जामसंडे, ता. देवगड, ६) सर्जेराव सावळा तांबे, वय-३४, रा. जामसंडे, ता. देवगड, ७) योगेश विलास बाणे, वय-४२, रा. जामसंडे, ता. देवगड ८) परमेश्वर रघुनाथ शींदे, वय-३२, रा. जामसंडे, ता. देवगड ९) अशोक गंगाराम साळस्कर, वय-४५, रा. वरेरी, ता.देवगड असे असल्याचे सांगितले. तसेच सदर खोलीमध्ये बाजुस उभ्या असलेल्या चार इसमांना त्यांचा नाव पत्ता विचरता त्यांनी आपली नांवे १०) चरण सुभाष बाणे, वय-३१, रा. जामसडे, ता. देवगड, ११) प्रकाश बाबला खरात, वय-४७, रा. तळेबाजार, ता. देवगड, १२) संतोष गंगाराम साळस्कर, वय-४६, रा.लिंगडाळ तिठा, ता. देवगड, १३) शार्दुल विश्वास कांबळे, वय-२८, रा. जामसंडे, ता. देवगड १४) संदीप जर्नादन मालणकर, वय-६०, रा. सध्या सिंधुदुर्ग सोशल स्पोर्टस अ‍ॅकेडमी देवगड मुळ रा. गवाणे यांच्यासह एकूण १४ जणांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ मधील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

पोलिसांनी कारवाईदरम्यान विविध व्यक्तींकडून मिळून ३ लाख ७४ हजार ३९० रुपयांची रोख रक्कम, तीन पत्ती खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्ते, टेबल व खुर्च्या जप्त केल्या. याशिवाय घटनास्थळी आणलेली विविध चारचाकी व दुचाकी वाहने तसेच मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे देवगड परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या प्रकारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg