loader
Breaking News
Breaking News
Foto

मिठबाव येथे उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते शोषखड्डा कामाचा शुभारंभ; गृहभेटींतून ग्रामस्थांमध्ये जनजागृती

देवगड (प्रतिनिधी) - देवगड पंचायत समितीच्या वतीने संपूर्ण देवगड तालुक्यात ‘घर तेथे शोषखड्डा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाचे व घरगुती सांडपाणी योग्य पद्धतीने जमिनीत मुरवून परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत रोजगार हमी व आजीविका मिशन (ग्रामीण) योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत मिठबाव येथील दीपक सहदेव मेस्त्री व विठ्ठल मधुकर मल्हार यांच्या जागेत शोषखड्डा उभारणीच्या कामाचा शुभारंभ पंचायत समिती देवगडचे उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजप विभाग अध्यक्ष शैलेश लोके, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अनंत लाड, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी सोमवाड, ग्राम रोजगार सहाय्यक सुहास मिठबावकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्याम कदम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शोषखड्डा अभियान केवळ बांधकामापुरते मर्यादित न ठेवता त्याबाबत जनजागृती करण्यावरही यावेळी भर देण्यात आला. अभियानाच्या अनुषंगाने मिठबाव परिसरातील घरोघरी भेटी देऊन ग्रामस्थांना शोषखड्ड्याचे महत्त्व, त्याचे पर्यावरणीय फायदे तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

घरगुती सांडपाण्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता कमी करणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे आणि गावाचे आरोग्य व पर्यावरण जपणे यासाठी प्रत्येक घरात शोषखड्डा असणे काळाची गरज आहे. ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ‘प्रत्येक घरात शोषखड्डा, स्वच्छतेचा गावोगावी ध्यास!’ या संकल्पनेतून देवगड तालुक्यात राबविण्यात येणारे हे अभियान ग्रामीण स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg