खेड (प्रतिनिधी): मजुरीचे पैसे न देता बळजबरीने काम करून घेऊन मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोटे पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश कल्लू बनवासी (वय २३, व्यवसाय - मजुरी, रा. नया बाजार, पो. ठाणे बदेदी, ता. राजपुरा, जि. बनारस, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. घाणेखुंट, सूर्यवाडी येथील चिरेखाणीवर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. सप्टेंबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मौजे घाणेखुंट व दाभोळ येथील चिरेखाणीवर ही घटना घडली.
संशयित आरोपी मुकादम राम धनसिंग राठोड व भरत धनसिंग राठोड (दोन्ही रा. रामपूर, ता. सिंदगी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक, सध्या रा. घाणेखुंट कांतळवाडी, ता. खेड) यांनी फिर्यादी यांना त्यांच्या मजुरीचे पैसे न देता बळजबरीने चिरेखाणीवर काम करून घेतले. फिर्यादी यांनी या कामाबाबत विरोध केला असता आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी लोटे पोलीस दूरक्षेत्र आकरन क्र. २११/२०२६ वरून गुन्हा रजिस्टर क्र. ३१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४६, १४२, ११५ (२), ३५१ (२), (३), (४) प्रमाणे तसेच वेठबिगारी कायदा कलम १६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.४२ वाजता हा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने पोहवा / २३४ कदम हे करीत आहेत.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.