loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

देवगड (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी तळेबाजार हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात तस्मिन तोहीत होलसेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच १७ वर्षांखालील गटात विराज विनोद चौगुले याने द्वितीय क्रमांक, तर सक्षम महेश काकतकर याने चतुर्थ क्रमांक मिळवला. या तिन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाशिक्षक सुरेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg