loader
Breaking News
Breaking News
Foto

राजवाडीतील श्री सोमेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव उत्साहात संपन्न; हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळला परिसर!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील प्राचीन आणि जागृत देवस्थान असलेल्या श्री सोमेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आणि पायवाटा हजारो पणत्यांच्या लखलखाटाने उजळून निघाल्या होत्या. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सायंकाळपासूनच मंदिरात ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंदिर परिसरातील ऐतिहासिक दीपमाळ पूर्णपणे पणत्यांनी सजवण्यात आली होती. चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि दीपमाळेच्या तेजात संपूर्ण परिसर न्हाऊन निघाल्याने अत्यंत विलोभनीय व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. केवळ मंदिरच नव्हे, तर मंदिराकडे येणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते लांबवर पसरलेल्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थांनी रांगोळी व पणत्यांची आरास केली होती. दगडी बांधकाम असलेल्या या सुंदर मंदिराच्या सभोवताली लावलेल्या पणत्यांमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.

टाईम्स स्पेशल

या सोहळ्यासाठी राजवाडी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामूहिक सहभागातून पार पडलेल्या या दीपोत्सवामुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg