देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील आणि राजापूर-लांजा -साखरपा मतदार संघातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या अडीअडचणी व समस्या निवारणासाठी तसेच दुष्काळग्रस्त समस्येबाबत माहिती घेण्यासाठी आमदार भैय्या सामंत यांनी शनिवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी घेतलेल्या सभेत पाणी पुरवठा व इतर विभागातील अधिकार्यांना धारेवर धरले. या समस्यानिवारण व दुष्काळग्रस्त अडचणीवर मात करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद गटाबाबत महसूल विभागाव्यतिरिक्त कोणत्याही विभागाकडे कार्यालयीन पूर्ण माहिती नसल्याने आमदार भैया सामंत गरजले. विशेष करून या सभेत पाणीपुरवठा विभागाला लक्ष करण्यात आले होते. दुष्काळग्रस्त भागात पाण्याची अडचण होऊ नये म्हणून काय योजना केली किंवा काय माहिती आणली, असे संबंधित कार्यालयाच्या अधिकार्यांना विचारले असता कोणतीही ठोस माहिती न मिळाल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली. ही सभा मुळात पाणी विषयासाठी आयोजित केल्याचे म्हणून यापुढे पूर्ण माहिती असल्याशिवाय आपण इथे येऊ नये, असे संबंधित अधिकार्यांना सुनावले.
पंचायत समिती अधिकार्यांच्याकडेही पूर्ण माहिती मिळू शिकली नाही. मात्र गाव लेवलला ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी चांगले काम करत असल्यामुळे समाधान व्यक्त केले. गावात पाणी अडवण्यासाठी जास्तीत जास्त बंधारे बांधा असेही सांगून यापुढे कोणत्याही कार्यालयातील अधिकार्याला तुम्ही बोलावून सहकार्य मागू शकता, असे ग्रामसेवकांना आमदार किरण सामंत यांनी सांगितले. वनविभागाच्या अधिकार्यांनीही पाणी आडवा पाणी जिरवा असे बंधारे बांधावेत, असेही यावेळी सांगण्यात आले. एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनाही काही तक्रारीबाबत सूचना देण्यात आल्या. शेतकर्यांच्या होणार्या शेतीचे पंचनामे त्वरित करून ई-पीकपाणी नोंद त्वरित करण्याबाबत ही सूचना देण्यात आल्या. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला रत्नागिरी नागपूर हायवेचा ठेकेदार अडचण ठरत आहे रोज हजारो लिटर पाणी वापरत असून त्याबाबत त्यांना समज देऊन त्यांनीच मोठा बंधारा घालून पाणी अडवून वापरावे अशी सूचना संजय गांधी यांनी केली. महसूल विभाग सोडून इतर कोणत्याही कार्यालयातील अधिकार्यांनी पूर्ण माहिती न आणल्याने आमदार भैय्या सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.
महावितरणच्या अधिकार्यांनी कोणत्याही ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित करू नये किंवा थकीत बिल असलेल्या ग्रामपंचायतींना नवीन मीटर जोडणीसाठी अडवू नये त्यांना त्वरित नवीन मीटर द्यावा, असे आमदार किरण सामंत यांनी या सभेत जाहीर केले. शेतकर्यांचा कृषी पंपांचा वीजपुरवठा बिल थकीत असले तरी तोडू नये व यापुढे साडे सात एच.पी.पर्यंतचे बिल माफ असल्याचे सांगितले. शेतीचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना ७/१२ काढण्यास गेल्यास साईट बंद असल्याचे सांगितले जाते त्यामुळे ही साईट त्वरित चालू करून शेतकर्यांना अडचणी पासून वाचवावे व ई पीक पाणी त्वरित करून द्यावे, अशी मागणी मेघीचे उपसरपंच गंगाराम केसरकर यांनी केली. येत्या चार-पाच दिवसात ही साईट व्यवस्थित होईल, असे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले. या सभेला आमदार भैय्या सामंत माजी आमदार सुभाष बने, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके प्रांत अधिकारी जीवन देसाई तहसीलदार अमृता साबळे, संगमेश्वर पोलीस निरीक्षक किणी, पाणीपुरवठा विभाग, महावितरण विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग शिक्षण विभाग, एसटी महामंडळ, भूमी अभिलेख विभाग, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक, कार्यकर्ते शेतकरी वर्ग उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन जिल्हा नियोजन सदस्य बापूशेट्ये यांनी केले.




































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.