loader
Breaking News
Breaking News
Foto

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे ना. उदय सामंत यांची भेट; उपक्रमांची केली पाहणी

रत्नागिरी: शिरगाव, रत्नागिरी स्थित मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन ला महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरीचे आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली आणि महाविद्यालयातील सुविधांची पाहणी केली. महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसायात रत्नागिरी जिल्हा महत्वाचे स्थान राखून आहे. मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी सर्वदूर प्रयत्न होत असताना, मत्स्य व्यवसायात शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाद्वारे विकासाची द्वारे उघडण्यासाठी, शास्त्रोक्त आणि शाश्वत मासेमारी करिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नागिरी येथे मच्छिमारांच्या मागणीप्रमाणे सन २०११ साली मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन ची स्थापना करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील विद्यार्थ्यांना १० वी नंतर (११ वी आणि १२ वी न करता) थेटपणे मत्स्य व्यवसायातील व्यावसायिक शिक्षण प्राप्त व्हावे या करिता तीन वर्ष मुदतीचा पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. कमीत-कमी कालावधीत व्यावसायिक शिक्षण घेवून रोजगार आणि स्वयं-रोजगार च्या संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न. या शासकीय मत्स्यकी तंत्रनिकेतन मध्ये मुख्य शैक्षणिक इमारत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी करिता स्वतंत्र वसतिगृह सुरु करण्यात आलेली असून, मासेमारी जाळे, इंजिन, नौका, मत्स्य प्रक्रिया कार्यशाळा आणि मत्स्यबीज उत्पादन केंद्र निर्मिती प्रगतीपथावर आहे. या सर्व पायाभूत सोयी-सुविधांची मा. सामंत साहेब यांनी पाहणी केली आणि आवश्यक सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले.

टाईम्स स्पेशल

मत्स्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी सौदार्ह्यपूर्ण चर्चा झाली. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे कौशल्य विकासावर जास्तीत-जास्त भर देण्या साठी आणि कोकणात मत्स्य उद्योजक निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या भेटीच्या वेळी मत्स्य अभियांत्रिकी तंत्र निकेतन चे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांनी विस्तृतपणे सर्व माहिती सादर केली. शिक्षक तौसीफ काझी, डॉ सुशील कांबळे आणि मयुरी डोंगरे यांनी विविध प्रात्याक्षिके कसे घेतली जातात याची माहिती दिली. सामंत यांच्या भेटीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये उत्साह निर्माण झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg