loader
Breaking News
Breaking News
Foto

बंद पडलेल्या शाळेच्या पटावर शेकडो बोगस विद्यार्थी; संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक प्रकार

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटल्याचे कारण दाखवून दीड वर्षापूर्वी कुलूप ठोकण्यात आलेली शाळा कागदावर मात्र धडधडीत सुरू असून, तिच्या पटावर शेकडो विद्यार्थ्यांची बोगस नोंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. छत्रपतींच्या नावाशी साम्य असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात सुरू असलेला हा ’महाघोटाळा’ उघडकीस आल्याने संपूर्ण कोकणातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी पटसंख्येअभावी बंद पडलेल्या या विद्यालयाचा कारभार कोल्हापूर येथील एका नामांकित व्यक्तीने हाती घेतला आहे. सध्या या शाळेच्या बंद कार्यालयात नियमितपणे ’कांबळे’ नामक एक शिक्षक आणि एक अनामिक व्यक्ती येऊन बसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कागदोपत्री शेकडो विद्यार्थी दाखवले असले तरी प्रत्यक्ष वर्ग कुठे भरतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, २८ डिसेंबर २०२५ रोजी काही विद्यार्थी आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संगमेश्वर येथे परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी हे थेट कोल्हापूर येथून आणल्याचे उघड झाले आहे. या संशयास्पद कारभाराची माहिती मिळताच स्थानिक पत्रकारांनी तालुका पातळीवरील शिक्षण अधिकार्‍यांकडे विचारणा केली. सुरुवातीला हात वर करणार्‍या अधिकार्‍याने गुरुवारी (१ ऑक्टोबर) प्रत्यक्ष शाळेला भेट दिली. मात्र, नेहमीप्रमाणे शाळा बंदच आढळली. अधिकार्‍याने कांबळे नामक शिक्षकाला फोन केला असता, त्याने तब्येत बरी नाही, असे सांगून काढता पाय घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg