loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी, ‘Campus Se Sansad’ उपक्रमासाठी महाराष्ट्रातून निवड

पनवेल : शिवाजी नगर, पनवेल येथील गुलाब हुसेन बागवान, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल येथील एम.ए. प्रथम वर्ष (अर्थशास्त्र)चा विद्यार्थी, याची ‘Campus Se Sansad’ या राष्ट्रीय उपक्रमासाठी महाराष्ट्रातून निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमांतर्गत गुलाब बागवान यांनी नवी दिल्लीतील संसद भवन व राष्ट्रपती भवनाला भेट देत देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा त्यांचा हा प्रवास पनवेलसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

टाईम्स स्पेशल

राज्यसभा खासदार विनोद तावडे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संसद आणि लोकशाही प्रक्रियेची जवळून ओळख होण्याची संधी मिळत आहे. गुलाब बागवान यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर तसेच शिक्षकवृंदांनी त्यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg