दापोली : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील खेर्डी येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा दापोली पंचायत समिती सभापती व विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत दिमाखत पार पडला. खेर्डी ग्रामविकास मंडळ मुंबई रजि. यांच्या विद्यमाने गेली 25 ते 30 वर्ष सातत्याने हा उपक्रम इयत्ता 10 वी, 12 वी व पदवीधर आणि शाळेतील इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात येत असतो. तसेच विशेष प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती, क्रीडा व मुंबई अभ्यास दौऱ्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत असतो. हा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष नारायण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापोली पंचायत समिती सभापती उन्मेष राजे उपस्थित होते. यावेळी राजे म्हणाले की, असा सातत्याने मुंबईवरून येऊन हा उपक्रम राबविणारे खेर्डी मुंबई मंडळ एकमेव उदाहरण आहे. दिवसेदिवस जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पट कमी होत असताना या शाळेने आपला पट राखण्यात यश मिळवले आहे. तालुक्यात काय किंवा जिल्ह्यात काय अनेक कारणांनी विद्यार्थी पट संख्या कमी होत चालली आहे, परतू खेर्डी मुंबई मंडळ खास लक्ष देऊन असतात, या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर, इजिनियर्स, वकील इतर क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात विध्यर्थ्यांच्या स्वागत गीत गायनाने झाली. नंतर शाळेतील मुलांना बक्षीस देण्यात आले व नंतर 10 वी, 12 वी व पदवीधर, पुढे अनेक मान्यवरांनी मुलांना शुभेछा दिल्या. यावेळी यावर्षी इयत्ता 10 वी मध्ये 99% गुण मिळवून कुमारी नित्या रविंद्र गायकर, ज्ञानदीप हायस्कूल, दापोली हिने यश मिळवले तिला भेट वस्तू देऊन खास सत्कार करण्यात आला. मंडळाचे जेष्ठ सदस्य विजय जाधव यांनी शिक्षणाबाबत योग्य माहिती दिली. मुलांनी मोबाईलमध्ये जास्त न राहता वेगवेगळी पुस्तके वाचणे त्यातून बोध घ्यावा असे सांगितले, खेर्डी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. दापोली पंचायत समितिमार्फत पाणी अडवा, पाणी जिरवा हा उपक्रम राबविला जात आहे, त्यामुळे मुलांनी देखील पाणी जास्त वाया घालून नये असे सांगितले. यावेळी कार्यक्रमास दापोली गट शिक्षण अधिकारी आर वी कांगडे, केंद्र प्रमुख आग्रे, अमोल मोरे तसेच मुंबई मंडळाचे सदस्य राजू जाधव, प्रकाश तांबे, सुरेश गायकर, शशिकांत जाधव, महेंद्र यादव, मधुकर शिगवण, राजेंद्र बैकर, अशोक भांबीड, राकेश बैकर, विदेश बैकर, खेर्डीचे माजी उपसरपंच गुरुदास सवसनकर, माजी विद्यार्थी संघ मंगेश भुवड, माजी शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष शांतराम गायकर, मंडळाचे जेष्ठ सदस्य व माजी सेक्रेटरी विठ्ठल पवार, ग्रामस्थ अरुण करबेले, दत्ताराम गोरीवले, गंगाराम चोपडे, राजन तेरेकर, सचिन चोपडे, मनोज गोरीवले, रोशन करबेले, निलेश गायकर, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी उपसरपंच शरद तांबे, मुख्याध्यक गांधी, नवीन देऊळ कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र जाडे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष व खेर्डी ग्रामपंचायत माजी सदस्य सानिका मांडवकर, यादव गावातील महिला वर्ग, विद्यार्थी, शिक्षक, उपस्थित होते.
सभापतीनी खेर्डी शाळेच्या मागण्या तात्काळ पूर्ण करून देतो असे सांगितले, या शाळेची प्रगती होत राहिली पाहिजे शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी न राहता वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रात भरारी घेत आहे याचा सार्थ अभिमान आहे, खेर्डिकर ग्रामस्थानी बंधारे या उपक्रमास उचलून धरले त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले, त्यांच्या मनोगतात गृह राज्यमंत्री कोणताही निधी देण्यास कमी पडणार नाहीत, पालक मंत्री ना. उदय सामंत यांनी दिलेले सर्व उपक्रम दापोली मतदार संघातील जनता भाग घेत आहेत. त्यामुळे मला काम करण्यास वेगळा आनंद मिळत आहे. शेवटी आलेले सर्व मान्यवर व शिक्षक व ग्रामस्थ यांचे आभार मानले आणि मुलांना शुभेच्छा या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन मंडळाचे सहसचिव तुकाराम खामकर, खजिनदार रमेश पवार यांनी केले. प्रास्तविक मुख्याध्यक उदय गांधी गुरुजी यांनी मांडले व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी रविंद्र बैकर यांनी केले. कार्यक्रमास ज्यानी आर्थिक सहकार्य केले त्याची नावे वाचली. कार्यक्रम शेवटी अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात हे मंडळ केवळ आणि केवळ सांस्कृतिक वारसा जपणे व आपल्या गावातील मुलांच्या भवितव्यासाठी काय करता येईल याचेच कार्य केले सर्वांना सोबत घेऊन मुंबई खेर्डिकर आहेत त्यांना संघटित कसे राहता येईल याचे नेहमी मार्गदर्शन करतात. ज्यांनी मंडळ उभारणीसाठी योगदान दिले त्या आजी/ माजी अधिकारी पदाधिकरी यांचे आभार मानले जे मुंबई वरून येऊ शकले नाहीत परंतु नेहमी मंडळाला योगदान असते अशा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देऊन कार्यक्रम संपला.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.