loader
Breaking News
Breaking News
Foto

चिंचघर येथे दीपावली निमित्त भव्य रांगोळी स्पर्धा संपन्न; वैष्णवी शिंदे प्रथम

खेड : श्री. भैरवनाथ मंदिर देवस्थान, चिंचघर व शिवसेना उपनेते, माजी आमदार संजयराव वसंतराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली २०२६ निमित्त भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलेचे दर्शन घडवले आणि आकर्षक व उत्तम अशा रांगोळ्या साकारल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी वैष्णवी शिंदे, द्वितीय क्रमांकाच्या मानकरी हेमांगी दळवी व श्रद्धा कडू, तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी पूर्वा जाधव या विजेत्या ठरल्या. या शुभप्रसंगी शिवसेना उपनेते, माजी आमदार संजयराव वसंतराव कदम, तंटामुक्त अध्यक्ष व देवस्थान कमिटीचे सदस्य रुपेश महाडिक, संदीप सावंत, रोशन जाधव, प्रसाद कदम, संजय शिंदे, प्रतीक शिंदे, सोनाली शिंदे व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg