संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी-शास्त्रीपूल मार्गावर गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, यासाठी नव्याने डांबरीकरण करण्यात आलेले रस्ते खोदले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांसह वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्ते खोदल्यानंतर पुन्हा डांबरीकरण करण्याऐवजी मातीचा भराव टाकून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जात असल्याने आगामी पावसाळ्यात या मार्गांची दुरवस्था होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. डिंगणी खाडीवाडी येथे जाणारा रस्ता रातोरात खोदण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी रस्ता खोदल्यानंतर डांबरीकरण न करता केवळ मातीचा भराव टाकण्यात आल्याने रस्त्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असुर्डे, जांभूळवाडी यांसह अनेक गावांना जोडणारे डांबरी रस्ते गॅस पाइपलाइनसाठी खोदले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची नावे सांगून ही खोदाई केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, रस्ते खोदण्यापूर्वी आवश्यक परवानग्या, कामाची गुणवत्ता आणि खोदाईनंतर रस्त्यांची पूर्ववत दुरुस्ती याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. दुसरीकडे, स्थानिक शेतकर्यांच्या जमिनीमधून पाइपलाइन टाकण्याचे काम योग्य मोबदला न देता केले जात असल्याचा आरोप होत असल्याने शेतकरीही संतप्त झाले आहेत. एकीकडे शेतकर्यांच्या जमिनींचा प्रश्न आणि दुसरीकडे सार्वजनिक वापरातील डांबरी रस्त्यांची खोदाई, अशा दुहेरी संकटात स्थानिक नागरिक सापडले आहेत.
या प्रकाराबाबत भाजपचे नेते राकेश जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्व संबंधित गावांतील ग्रामस्थांना एकत्र करून या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल. तसेच वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊन गॅस पाइपलाइनचे काम करणार्या ठेकेदार कंपनीविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गॅस पाइपलाइनचे काम करताना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, खोदलेले रस्ते तातडीने दर्जेदार डांबरीकरण करून पूर्ववत करावेत आणि शेतकर्यांच्या जमिनींच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा डिंगणी-शास्त्रीपूल परिसरातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.