loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी आमदार प्रमोद जठार रणांगणात

राधानगरी : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव (पुणे पदवीधर) आणि कौस्तुभ गावडे (शिक्षक) यांच्या विजयासाठी आमदार प्रमोद जठार यांनी राधानगरी तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत शिक्षक, प्राध्यापक व शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांशी संवाद साधला. या दौऱ्यात जागृती हायस्कूल, राधानगरी; राधानगरी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय; श्री यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सोळांकुर; आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम हायस्कूल, सरवडे; श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय, तंत्र विभाग व ज्युनिअर कॉलेज, सरवडे तसेच भागशाळा सावर्डे; किसनराव मोरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सरवडे; के. पी. पाटील इन्स्टिट्यूट; आमदार श्री. नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय, कसबा वाळवे; रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाळवा आदी शैक्षणिक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिक्षकांशी संवाद साधताना आमदार जठार म्हणाले, “शिक्षक हा चाणक्य असतो. त्यामुळे योग्य निर्णय घेत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आपण विजयी कराल, असा मला विश्वास आहे.” शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेता विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच अत्याधुनिक व तंत्रज्ञानाधारित शिक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, विविध शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, टप्पावाढीचा शासन निर्णय आगामी अधिवेशनात मांडावा तसेच शिक्षकांच्या प्रलंबित विविध प्रश्नांची सोडवणूक करावी, अशा मागण्या आमदार जठार यांच्यासमोर मांडल्या. शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

या दौऱ्यादरम्यान राधानगरी येथे राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील, स्वप्नील जरग, विलास रणदिवे, सचिन वासुदेव, प्रकाश चव्हाण, सुरज शेळके, महेश चिऊलकर, आशिष चांदम, विजय गुरव, सुनील चौगुले, मानसिंग पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मुदाळ तिठा येथे माजी आमदार के. पी. पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, पंडितराव केणे, विश्वनाथ कुंभार, गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, मौनी विद्यापीठचे चेअरमन मधुकर देसाई, प. बा. पाटील शिक्षण संस्थेचे सचिव विकासराव पाटील, कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे चेअरमन प्रा. शेखर देसाई, गोकुळचे माजी संचालक विलासराव कांबळे, बिद्रीचे माजी संचालक सुनीलराव कांबळे, प्रा. एच. आर. पाटील, विजय कोटकर, प्रा. संतोष मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी राधानगरी तालुक्यातील शिक्षक व पदवीधर मतदारांशी थेट संवाद साधत आमदार प्रमोद जठार यांनी प्रचाराला वेग दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg