loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुक्यातील निवोशी येथे भात नुकसानीची सभापती प्रणव पोळेकर यांनी केली पाहणी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी आज सकाळी निवोशी गावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. भात पिकाची वाढ खुंटल्याने आणि जमिनीला भेगा पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सभापती पोळेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतात प्रत्यक्ष पाहणी करताना अनेक ठिकाणी भाताचे पीक करपल्याचे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे दिसून आले. उपस्थित तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

टाईम्स स्पेशल

झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg