loader
Breaking News
Breaking News
Foto

नसबंदी केंद्रातील ३१ कुत्रे एकाच ठिकाणी बंदिस्त; अस्वच्छतेवर नागरिकांचा संताप!

देवगड (प्रतिनिधी) - मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेच्या नावाखाली कुत्र्यांच्या सुरक्षिततेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नसबंदी मोहिमेसाठी कचरा व्यवस्थापनाच्या घंटागाडीचा वापर कुत्र्यांच्या वाहतुकीसाठी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर जामसंडे येथील प्राणी जन्म नियंत्रण केंद्रात एकाच खोलीत १९, तर दुसर्‍या खोलीत १२ कुत्र्यांना बंदिस्त ठेवण्यात आल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले. याच ठिकाणी नवजात पिल्लेही ठेवण्यात आल्याने केंद्रातील स्वच्छता, व्यवस्थापन आणि कुत्र्यांच्या देखभालीबाबत युथ फोरम-देवगडसह जागरूक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या आक्षेपानंतर स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी आणि मुख्याधिकारी देवदत्त माने यांनी केंद्राची पाहणी केली. देवगड-जामसंडे नगरपंचायत क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची नसबंदी मोहीम एका खासगी एजन्सीमार्फत राबविण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी रात्री नगरपंचायतीच्या घंटागाडीतून कुत्र्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच युथ फोरमचे अध्यक्ष अ‍ॅड. सिद्धेश माणगांवकर यांच्यासह सोहम पारकर, श्रुती माणगांवकर, दीपक जानकर, गोविंद माळी, जितेश मोहिते, ओंकार सारंग, तौकिर शेख, ऋत्विक धुरी तसेच स्थानिक ग्रामस्थ नाना सारंग, रवींद्र चिंदरकर आदींनी केंद्रावर धाव घेतली. कुत्रे पकडण्यासाठी वापरण्यात येणार्‍या एजन्सीच्या वाहनाला काही दिवसांपूर्वी आग लागून नुकसान झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून नगरपंचायतीच्या घंटागाडीचा वापर केला जात असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. मात्र, कचरा वाहतुकीसाठी असलेल्या घंटागाडीचा वापर कुत्र्यांच्या वाहतुकीसाठी करणे अयोग्य असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. नसबंदी मोहिमेसाठी स्वतंत्र वाहन किंवा भाडेतत्त्वावर वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

टाईम्स स्पेशल

केंद्राच्या पाहणीदरम्यान एका खोलीत १९ आणि दुसर्‍या खोलीत १२ कुत्रे बंदिस्त असल्याचे दिसून आले. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने कुत्रे ठेवण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत असून, परिसरात अस्वच्छता असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याच खोल्यांमध्ये नवजात पिल्लेही ठेवण्यात आली होती. गरोदर कुत्रींनाही पकडून वाहनांमध्ये कोंबले जात असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. कर्मचार्‍यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नागरिकांनी व्यवस्थापनाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg