loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य अन् सायबर सुरक्षा; सुहेल मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

रत्नागिरी (जमीर खलफे) : सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक सुहेल मुकादम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे औचित्य साधत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नगरसेवक मुकादम यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ व स्थानिक नागरिकांसाठी ‘सायबर फ्रॉड अवेअरनेस’ या विषयावर मार्गदर्शनपर संवादाचे आयोजन करण्यात आले. या विशेष संवादासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नागिरीतील नामांकित सायबर लॉ एक्सपर्ट ॲडवोकेट अमित मधुकर नागवेकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमादरम्यान तंत्रज्ञान आणि कायदा या दोन्ही क्षेत्रांतील अनुभवाचा मिलाफ साधत ॲड. अमित नागवेकर यांनी सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, बनावट कॉल्स, ओटीपी व केवायसी फ्रॉड, बँकिंग आणि सोशल मीडियावरील गैरप्रकार यावर प्रकाश टाकला. ऑनलाइन व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी घ्यावयाची दक्षता त्यांनी रोजच्या जगण्यातील उदाहरणे देत सुलभ भाषेत मांडली. केवळ एकतर्फी भाषण न देता उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या शंकांना कायदेशीर व तांत्रिक दृष्टिकोनातून समाधानकारक उत्तरे देत त्यांनी थेट संवाद साधला, ज्यामुळे हा उपक्रम उपस्थितांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

टाईम्स स्पेशल

या जनजागृती कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश पाटील, न्यायाधीश बरबे, विधी सेवा विभागाचे रोहित जोशी आणि स्थानिक पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही ज्येष्ठांना कायदेशीर अधिकार, कायदेशीर मदत आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल युगातील धोके ओळखून ज्येष्ठांना सुरक्षित व्यवहारांसाठी सक्षम करणारा तंत्रज्ञान, कायदा आणि सामाजिक दायित्वाचा हा अनोखा संगम ठरला असून, वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg