पुणे \देवरुख (प्रतिनिधी) : वेस्टर्न क्लब आयोजित आंतरक्लब १३ वर्षांखालील मुलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत लाईनअप ॲकॅडमीने डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीवर सहा गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अवनीश अभिषेक कुलकर्णी! त्याने गोलंदाजीत अवघ्या १७ धावा देत चार बळी मिळवले, तर फलंदाजीत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीने स्पर्धेत विशेष लक्ष वेधून घेतले. भूगाव येथील द पूना वेस्टर्न क्लब (पीडब्ल्यूसी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीने १८ षटकांत १६१ धावा केल्या. कोकरे याने नाबाद ५३, तर युवी याने ४५ धावा केल्या. लाईनअप ॲकॅडमीकडून अवनीश कुलकर्णी याने भेदक गोलंदाजी करत अवघ्या १७ धावांत चार फलंदाजांना माघारी धाडले.
१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लाईनअप ॲकॅडमीने १५.२ षटकांत सहा गडी राखून विजय मिळवला. वरद जोशी याने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली, तर अवनीशने ४० धावांचे योगदान देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांत चमकदार कामगिरी करत अवनीशने आपल्या अष्टपैलू क्षमतेची प्रभावी छाप पाडली.
दरम्यान, स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ॲकॅडमीने डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीचा तब्बल १६० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स ॲकॅडमीने २० षटकांत २५२ धावांचा डोंगर उभा केला. रणवीर मालवडकर याने अवघ्या ५८ चेंडूंत १९ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने १०८ धावांची तुफानी शतकी खेळी केली. विनायक जाधव याने ७८ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. प्रत्युत्तरात डीजेसीए क्रिकेट ॲकॅडमीचा संपूर्ण संघ ९२ धावांत गारद झाला. राजस्थान रॉयल्सकडून विराज फराटे याने तीन, तर सद्गुरू रेड्डी याने दोन बळी मिळवत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अवनीश कुलकर्णीच्या ४ बळी आणि ४० धावांच्या दुहेरी कामगिरीमुळे लाईनअप ॲकॅडमीच्या विजयाला विशेष झळाळी मिळाली.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.