loader
Breaking News
Breaking News
Foto

‘मिशन बंधारे – एक दिवस बंधाऱ्यासाठी’ उपक्रमांतर्गत वरवेलीत श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली गावात ‘मिशन बंधारे – एक दिवस बंधाऱ्यासाठी’ या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत वरवेली व गुहागर महसूल विभागाच्या वतीने लोकसहभागातून दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत वरवेलीच्या वतीने रांजाणेवाडी येथील विहिरीजवळ, तर गुहागर महसूल विभागाच्या वतीने मराठवाडी येथील श्री भटभैरी मंदिराजवळील नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. गावातील ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येत श्रमदानातून जलसंधारणाचा आदर्श घालून दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमावेळी गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य उर्वी खैर, वरवेली ग्रामपंचायतीचे सरपंच नारायण आगरे, ग्रामपंचायत सदस्य अरुण रावणग, नरेश रांजाणे, शैलेश नारकर, श्रावणी शिंदे, पंचायत समिती विस्तार अधिकारी कदम व पिंगळे, मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र भुवड, महसूल अधिकारी राधा आघाव यांच्यासह महसूल विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आशिष विचारे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश गायकवाड, आरोग्य सेविका प्रज्ञा पागडे, आरोग्य सेवक अभिलाष इंगोले, अंगणवाडी सेविका, विविध विभागांचे कर्मचारी, रांजाणेवाडी व मराठवाडी येथील ग्रामस्थ तसेच गावातील प्रमुख ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी अडविणे, जमिनीत पाणी मुरविणे आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई कमी करण्यासाठी वनराई बंधारे महत्त्वपूर्ण ठरतात. वरवेली गावातील दोन ठिकाणी बंधारे बांधून ग्रामस्थांनी जलसंधारणासाठी एकजुटीने पुढाकार घेतला आहे. शासनाच्या उपक्रमाला ग्रामस्थांच्या श्रमदानाची जोड मिळाल्याने गावात जलसंवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचला आहे. ‘मिशन बंधारे – एक दिवस बंधाऱ्यासाठी’ या उपक्रमांतर्गत वरवेली गावात दोन वनराई बंधारे यशस्वीपणे उभारण्यात आले. या कामासाठी सहकार्य करणारे सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच रांजाणेवाडी, मराठवाडी व वरवेली गावातील सर्व ग्रामस्थांचे सरपंच नारायण आगरे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ग्रामस्थांची एकजूट, प्रशासनाचे सहकार्य आणि श्रमदानाची ताकद यांचा सुंदर संगम घडविणारा वरवेलीतील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg