loader
Breaking News
Breaking News
Foto

चराठा टेंबवाडी येथील २४ वर्षीय तरुणाची राहत्या घरात कुत्रा बांधण्याच्या साखळीने गळफास घेवून आत्महत्या

सावंतवाडी - चराठा टेंबवाडी येथील परेश उमेश तांबोसकर (वय २४) या तरुणाने स्वतःच्या राहत्या घरातील खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी १० वा उघडकीस आली. त्याच्या खिशात आत्महत्या पूर्वी चिठ्ठी सापडली असून त्यात मी स्वतः जीवन संपवत आहे कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले होते. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील मयत युवक गुरुवारी आपल्या घरातील खोलीत झोपला होता तो उशिरापर्यंत बाहेर न आल्याने चुलत भाऊ याने सकाळी साडेआठच्या सुमारास दरवाजा उघडून आत पाहिले असता परेश हा खोलीतील लाकडी वाशाला कुत्रा बांधण्याच्या साखळीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला खाली उतरवून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने गावातील खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी परेश याला मृत घोषित केले. युवकाच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यात मी स्वतः जीवन संपवत आहे कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत अधिक तपास पो. हे. सुरेश पाटील करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg