loader
Breaking News
Breaking News
Foto

९१ वर्षीय वृद्धेला लाकडी बांबूने मारहाण, लेकीच्या तक्रारीवरुन नायरीतील इसमाविरोधात गुन्हा दाखल

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथे एका ९१ वर्षीय वृद्ध महिलेला लाकडी बांबूने तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत वृद्ध महिलेच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला तसेच उजव्या मनगटाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नाशिरा अस्लम मोडक (रा. नायरी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी जैबुनिसा निजामुद्दीन लांबे (वय ६०, व्यवसाय गृहिणी, रा. नेरूळ, नवी मुंबई) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. ही घटना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान नायरी येथील राहत्या घरी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी यांच्या आई जलेखा इसाक मोडक (वय ९१ वर्षे) या वृद्ध असल्याने त्यांची देखभाल करावी लागते. तसेच त्यांना कुठेही फिरायला जाता येत नसल्याच्या कारणावरून आरोपीने त्यांना लाकडी बांबूने तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत वृद्ध महिलेच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला आणि उजव्या मनगटाला लहान-मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणी १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२.२४ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक १४६/२०२६ असून भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११५(२) व ११५(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपलब्ध नोंदीत दिसून येते. वृद्धापकाळात आई-वडिलांना आधार, प्रेम आणि सुरक्षिततेची गरज असते. अशा परिस्थितीत ९१ वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे. वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या देखभालीचा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असून, आरोपीवरील दोष न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg