loader
Breaking News
Breaking News
Foto

वाटद एमआयडीसीविरोधात सहा गावांचा एल्गार; भूसंपादनाच्या राजपत्राला विरोध, ग्रामस्थ एकवटले

रत्नागिरी, : तालुक्यातील वाटद येथील सहा गावांमधील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक, सेवा व खनिकर्म विभागामार्फत वाटद आणि कळझोंडी येथील जमिनींच्या भूसंपादनासंदर्भातील अधिकृत राजपत्र (असाधारण सूचना) प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी सहा गावातील प्रमुखांची बैठक झाली. यामध्ये राजपत्र रद्द करण्याची मागणी करण्याचा निर्णय एकमताने घेतला. शासनाच्या अधिसूचनेनुसार वाटद, कळझोंडी, कोळीसरे, गडनरळ, वैद्यलावगण आणि कोळीसरे या सहा गावातील क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रस्तावित केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या काही गावांमधील जमिन संपादन करण्याचा निर्णय कलम ३२(१) अन्वये घेतला आहे. त्यानुसार नुकतीच भूसंपादनाविषयीचे राजपत्र काढले आहे. त्यात वाटद येथील सुमारे ३४९ हेक्टर आणि कळझोंडी येथील ७५ हेक्टर मिळून एकूण ४२५ हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियामुळे बाधित गावांतील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. भूसंपादनाला विरोध करण्यासाठी काल झालेल्या या बैठकीत आपल्या हक्काच्या जमिनी आणि गावांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रसंगी प्रशासनाविरोधात कडाडून विरोध दर्शवण्याचा ठाम निर्धार गावकर्‍यांनी केला आहे.

टाईम्स स्पेशल

आमच्यावर बळजबरीने लादण्यात आलेल्या एमआयडीसीच्या नोटिशी सरकारने व प्रशासनाने तातडीने मागे घ्याव्यात, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. वाडवडिलांपासून जपलेली शेती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती कोणत्याही परिस्थितीत उद्योगांच्या घशात घालू देणार नहीं, आपले गाव जगले, तरच राजकीय पक्ष जगतील; गावच उध्वस्त झाले तर राजकारणाचा उपयोग काय? असा पवित्रा ग्रामस्थांनी या बैठकीत घेतला आहे. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास जनआंदोलन तीव्र करण्याचा इशाराही बाधित गावांतील ग्रामस्थांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg