loader
Breaking News
Breaking News
Foto

मोर्ले–पारगड रस्त्यामुळे बाधित झालेल्या घरांना योग्य दर तसेच पर्यायी जागा द्या, पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सीमेवर वसलेल्या शिवकालीन पारगड किल्ला रस्ता यासाठी मोर्ले गावात खाजगी एक किलोमीटर क्षेत्र संपादन करावे लागते यात सात ते आठ घरे बाधित होणार आहे. तेव्हा सर्व घर मालकांना योग्य वाढीव दर मिळावा तसेच नवीन घर बांधणी करिता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निवेदन मोर्ले गावातील ग्रामस्थ ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी पालकमंत्री नितेश राणे याना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोर्ले गावातील ग्रामस्थ यांनी पालकमंत्री नितेश राणे याना दिलेल्या निवेदनात २०१७ मध्ये प्रतिचौरस मीटर १०, ५४० रुपये, तर २०२५ मध्ये ९,३१४ रुपये; दरातील तफावतीची चौकशी करून मागणी आम्हाला पूर्वी दर ठरला तोच मिळावा. शिवाय गावात घरे बांधकाम करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे म्हटले आहे. पारगड राज्यमार्ग क्र. १८७ च्या कामामुळे बाधित होणाऱ्या मोर्ले गावातील घरांच्या मूल्यांकन दरातील तफावतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग, दोडामार्ग यांच्या पत्रानुसार घरांचा मूल्यांकन दर प्रतिचौरस मीटर १०,५४० रुपये नमूद करण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

मात्र, सन २०२५ च्या नवीन मूल्यांकन दरपत्रकात हाच दर ९,३१४ रुपये दाखविण्यात आल्याने ग्रामस्थांकडून या तफावतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बाधित घरमालकांना नियमानुसार योग्य व न्याय्य मोबदला मिळावा, तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महेश यशवंत चिरमुरे यांच्यासह ग्रामस्थांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg