loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलमध्ये बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत; दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्याचाही उलगडा

पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार लाख रुपये किमतीची बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी नाशिक येथील अमोल शिरसाठ याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची बीएमडब्ल्यू मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. तपासादरम्यान कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचाही संबंध उघड झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता करंजाडे येथील आर-०४ परिसरातील प्लॉट क्रमांक २०८ येथे पार्क केलेली बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर स्पोर्ट्स मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानुसार वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोहवा अमोल पाटील, अविनाश गंथडे, संदेश म्हात्रे, पो.ना.सोमनाथ म्हात्रे, मिथुन भोसले, शशिकांत काकडे, किरण कराड, सचिन हांडे, मपोशी तेजस्विनी भगत, सुशीला चव्हाण आदींचे पथक सदर आरोपीचा शोध घेत असता त्या दरम्यान, पळस्पे महामार्ग वाहतूक पोलीस केंद्रातील पोहवा सचिन हांडे याने संशयावरून एका मोटारसायकलवरील दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक जण पळून गेला, तर दुसऱ्याला पोलिसांनी मोटारसायकलसह ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयित अमोल शिरसाठ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू मोटारसायकल फिर्यादीची चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून चार लाख रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

तपासादरम्यान, कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील ९० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेडएस मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली. तसेच, अटक आरोपी हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अन्य एका गंभीर गुन्ह्यातही पाहिजे आरोपी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित राकेश गोकुळ राठोड (वय २४, रा. गणेश पार्क, पंचवटी, नाशिक) हा अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. दोघांनी संगनमताने मोटारसायकल चोरी करण्यामागील उद्देश, इतर गुन्ह्यांतील संभाव्य सहभाग आणि चोरीच्या वाहनांची विल्हेवाट याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg